शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:38 IST)

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार

नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार असे बोलले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट संकेत दिले आहेत.ते  पुण्यात बोलत होते. 
 
यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे” असे शरद पवार म्हणाले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरु झाली होती.