मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (09:45 IST)

वऱ्हाडाच्या बसला कंटेनरची धडक, एक ठार, 12जखमी

Khopoli in Raigad on the Mumbai-Pune Express
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रायगडमधील खोपोली येथे लग्नाच्या वऱ्हाडाच्या खासगी बस आणि कंटेनरमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 12 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस एका लग्न समारंभातून परतत होती. बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. 
 
खोपोली जवळ बोरघाटात कंटेनरची एका खाजगी बसला मागून धडक दिली. या अपघातात बसच्या मागील भागाचा चुरडा झाला आहे.अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस सिंधुदुर्ग येथे लग्नाला गेली असून कोल्हापूर मार्गे वाशिंदला परत येताना कंटेनरने मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळतातच बचाव कार्य सुरु झालं असून मदतीसाठी आयआरबी , देवदूत, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे.   
 
 
 
Edited By- Priya Dixit