1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (07:42 IST)

औरंगाबादेत ११५ वार्डापैकी १९ वार्डमध्ये कोरोना पॉझिटीव्ह

Corona positive
औरंगाबाद शहरातील ११५ वार्डापैकी १९ वार्डमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे या वार्डाचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये पडेगाव, बेगमपुरा, सातारा, देवलाई, हुसैन कॉलनी, आंबेडकर नगर, शिवनेरी कॉलनी, सिडको एन1, सिडको एन ५, विश्रांती नगर, उल्कानगरी, शिवाजीनगर, कंचनवडी, पदमपुरा, उस्मानपुरा आदी वार्डचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हाधिका-यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.