शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (10:12 IST)

Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले, सक्रिय रुग्णांची संख्या 35 झाली

कोरोनाने पुन्हा डोकं वर करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहे. आता पर्यंत 35 रुग्ण कोरोनाचे आहे. त्यापैकी 27 रुग्ण मुंबईचे आहे. कोल्हापुरात 1 तर पुण्यात 2 रुग्ण आढळले. 23 रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आता पर्यंत 80,23,407 रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहे. मुंबईत कोरोनाचे 27 रुग्ण आढळले आहे. 

सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 चा पहिला रुग्ण केरळ मध्ये आढळला असून केरळ मध्ये 115 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहे.  केंद्र सरकार अलर्ट मोड वर असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. केंद्र सरकार ने इतर राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना कोव्हीड साठी उपाययोजना आखणे सांगितले आहे. 
 
Edited By- Priya DIxit