1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (13:15 IST)

10 हजारात कोविडचे डमी रुग्ण, सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर उपचार, बाधित मोकाट फिरत आहे

Aurangabad
औरंगाबाद- एक धक्कादायक प्रकरणात समोर आले आहे की येथील कोविड सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोकाट फिरत आहे. बोगस कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी 10 हजार रुपये दिले जात असल्याचे समजते.
 
माहितीप्रमाणे औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रुग्णालयात बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण तसेच बाधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची अँटीजेन टेस्ट केल्यावर दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं कळून आलं. नंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
 
काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. तरुणांच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांचाही गोंधळ उडाला. त्यांनी कोविड सेंटरमधून सुटका करण्याची मागणी केली. नंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.