Widgets Magazine

फटाके फोडण्याचा वाद वृद्धाने गमावला जीव

crackers
कोणता वाद कधी विकोपास जाईल हे सांगता येत नाही. सणासुदीत सुद्धा अनेक आपला राग काही कमी करत नाहीत याचाच प्रत्येय सोलापुरात आला आहे. फटाके फोडू नका या वादातून एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सोलापुरात घडली आहे.मृत वृद्ध व्यक्तीचं नाव काशीनाथ शंकर यामजले असं असून ते 80 वर्षांचे होते.

यामध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरुन मृत वृद्ध आणि एक तरुण
दोघांमध्ये बाचाबाची झाली होती . तर या मधील वृद्ध
काशीनाथ यामजले यांनी घरापुढे फटाके फोडू नको असं सांगितल्याने चिडलेल्या राहुल जमादार या 20 वर्षीय तरुणाने त्यांना जबर मारहाण केली. या घटनेत काशीनाथ यामजले जखमी झाले आणि
यांचा मृत्यू झाला. यानंतर सोलापूर बझार पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


यावर अधिक वाचा :