Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण

Last Modified शुक्रवार, 17 मार्च 2017 (17:09 IST)
धुळ्यापाठेपाठ आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी
Widgets Magazine
नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरेक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच डाँक्टरांनी बंद पुकारला आहे. आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशाराही देण्यात आला आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :