testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहितेचा खून

Last Modified बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:31 IST)
प्रेम प्रकरणातून १३ दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा राहत्या घरी कु-हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सदरची घटना बुलडाणातील निमखेड गावात घडली. सदर खून हा नवविवाहितेच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय आहे.
यात गणेश गजानन हिंगणे (२७) व मनिषा बाळु हिवरे (२१) या प्रेमीयुगलाचे नाव असून
२६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता.
दुपारी गणेश हिंगणे हा कामानिमित्त बुलडाणा तर त्याचे वडील गजानन हिंगणे हे दाताळा येथे बँकेत गेले होते. तर गणेशची आई कापूस वेचणी करिता शेतात गेलेली असल्याने मनिषा घरी एकटीच होती. याचवेळी तिचा निर्घृण खून करण्यात आला.


यावर अधिक वाचा :