Widgets Magazine
Widgets Magazine

रानगव्याचा प्राणघातक हल्ला, पत्रकार आणि शेतकरी ठार

crime
Last Modified शनिवार, 13 मे 2017 (10:29 IST)

कोल्हापूरातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला, तर या दुर्घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटी येथील कॅमेरामन - पत्रकार रघुनाथ शिंदे गव्याच्या हल्यात गंभीर जखमी होवून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले.

Widgets Magazine
रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते बांधावर उभा राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक देऊन 10-12 फुटांवर उडवून भिरकावून दिले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने आतड़ी बाहेर आली आणि दुसरे शिंग मांडीत घुसले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले असता उपचार सुरू असताना मृत झाले.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :