1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (21:52 IST)

धार्मिकस्थळी गर्दी अन् आपत्कालीन यंत्रणेचा मुद्दा चिंताजनक- शरद पवार

Crowds at religious places and the issue of emergency system is worrisome - Sharad धार्मिकस्थळी गर्दी अन् आपत्कालीन यंत्रणेचा मुद्दा चिंताजनक- शरद पवार Marathi Regional News  In Webdunia Marathi
जम्मू काश्मीरमधील कटरा येथे असलेले श्री माता वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत १३ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ हून अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीह दुर्दैवी घटनेबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले. मात्र, या दुर्घटनेत १२ जणांनी आपला जीव गमावला, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबद्दल शरद पवार यांनी शोक व्यक्त केला असून प्रार्थनास्थळानजीकच्या आपत्कालीन स्थितीचा मुद्दाही उपस्थित केला आहे.