Widgets Magazine
Widgets Magazine

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट,तिघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील पवनसूतनगर झोपडपट्टीतील घरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका महिलेसह दोन पाहुण्या बालकांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात मोहिनी भाऊसाहेब पवार (३१), करण कृष्णा वळवी (८) व रोहिणी शरद शिंदे (४) यांचा मृत्यू झाला आहे.
Widgets Magazine

दिवाळीनिमित्ताने पाहुणे आलेले असल्याने सोनीराम लिलके यांनी नव्यानेच घेतलेल्या सिलिंडरचे रेग्युलेटर लावण्यासाठी शेजारच्यांना मदत करण्यासाठी आवाज दिला. यामुळे भाऊसाहेब पवार आपल्या पत्नीसह लिलके यांच्या घरी आले. गॅसचे रेग्युलेटर लागत नसल्याने त्यांनी प्रयत्न करून पाहिला. मात्र शेजारीच चूलही पेटवलेली असल्याने सिलिंडरमधून गळती सुरू होऊन मोठा स्फोट झाला.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :