शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मे 2018 (17:18 IST)

डीएसके यांच्या मेहुनीची तुरंगात चौकशी

आर्थिक घोटाळा करत कोट्यावधी रुपयांची फसवून केल्या प्रकरणी पुणे येथे मराठी उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून येरवडा कारागृहात नेण्यात आल आहे. डी. एस. कुलकर्णी आणि या प्रकरणातील इतर आरोपींसमोर त्यांची चौकशी केली आहे. गुंतवणूकदार यांच्या सह  बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी अनुराधा पुरंदरे यांना पोलिसांनी  अटक केली. त्यानंतर  चार जूनपर्यंत पोलिस कोठडी न्यायलयाने सुनावली आहे. मात्र या प्रकरण गंभीर असल्याने पोलिस कोठडी दरम्यान अनुराधा पुरंदरे यांची डीएसके आणि इतर आरोपींसमोर चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यानुसार पोलीस अनुराधा पुरंदरे यांना येरवडा कारागृहात घेऊन गेले होते.
 
गुंतवणूकदार, बँक, डिबेंचर्स यांची दोन हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, डीएसकेंची पुतणी सई वांजपे, सई वांजपेचा नवरा केदार वांजपे, कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना या आधीच अटक केली आहे. अनुराधा पुरंदरेंकडे या डीएसकेंच्या कंपन्यांची 1986 पासून फायनान्स विभागाची जबाबदारी होती. या चौकशी मुळे मोठा फायदा होणार असे पोलिसांनी सागितले आहे.