Widgets Magazine
Widgets Magazine

दाभोलकर हत्या प्रकरण तपास कधी पूर्ण करणार

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:51 IST)

dabholkar

महाराष्ट्रातील  विचारवंत आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करणारे थोर समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद  पानसरे हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने तपास करणारया सर्वाना चांगलेच खडसावले आहे..  यंत्रणा हत्येच्या तपासात चालढकल करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे . तुम्ही तपास कधी संपवणार ? असा थेट सवाल विचारत कोर्टाने सीबीआयला फटकारून काढलं आहे . किती दिवस तुम्ही हा वेळ मारून नेणार आहात. तपास करताय मग दिसत का नाही असा खडा सवाल कोर्टाने विचारला आहे.
 
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे प्रकरणी मुंबई हायकोर्टाने  सीबीआयला चांगलंच कान टोचले आहेत. तुम्ही समजता असा  दाभोलकर खटला हा खटला एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. उद्या त्या जागी कोणीही असू शकतं. हे फक्त या कुटुंबियांसाठी आहे असं नाही. अशा प्रवृत्तींना रोखणं आवश्यक आहे. हत्येचा तपासासाठी कोर्टानं खूप वेळ दिलाय. आता आणखी वेळ देणार नाही असंही कोर्टाने सुनावलं आहे.तुम्ही तपास केला नाही तर इतर मार्ग विचार करावा लागेल असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता तरी कोर्टच्या  दबावात तरी तपास यंत्रणा काम करतील असे चित्र आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता रुग्णालयावर होणार गुन्हे दाखल

महाराष्ट्रातील असे खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही भूमिका ठेवलीच नाही पाहिजे , ...

news

विद्यार्थी प्रतिनिधींना तिकीटांसाठी आग्रह धरण्याचे आश्वासन – संग्राम कोते पाटील

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची संघटनात्मक बांधणी ...

news

बीबीसीच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत सनी लिऑनी

बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या 2016 मधील प्रभावशाली महिलांच्या यादीत सनी लिऑनीचा समावेश झाला ...

news

नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सुप्रीम कोर्टाने तूर्त नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. देशातील ...

Widgets Magazine