शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (16:42 IST)

शिवजयंतीनिमित्त रॅलीत तलवारी नाचवणं महागात पडलं

Nagpur viral video
शिवजयंतीच्या दिवशी तलवार नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता पोलिसांनी याची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना पाेलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
 
शिवजयंतीच्या दिवशी नागपूरच्या पारडी परिसरातून एक रॅली काढण्यात आली असून ही रॅली नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातून जात असताना बाईकवर जात असणार्‍या दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन त्या तलवारी झळकविल्या होत्या.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करून सहा जणांवर गुन्हा दाखल केला.