शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (10:15 IST)

बुडून बहीण-भावाचा मृत्यू

नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहतात. रविवारी सायंकाळी शीतल शैलेश कुमरे वय 5 व शिवम वय 3 वर्ष हे दोघेही शेतात असलेल्या तलावावर गेले होते तेथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात ही घटना घडली आहे.