शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (16:14 IST)

दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

Dipali Sayyed
सर्व शिवसैनिक हे शिवबंधनात बांधले गेलेले आहेत. धागा कितीही साधा असला तरी मात्र शिवसेनेसोबतचे शिवसैनिकाचे नाते अतुट आहे. चुका झाल्या असतील त्या विसरून सर्वांनी एकत्र यावे सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा अशा आशयाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची आहे.  दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘शिवबंधन आजही सर्व शिवसैनिकांच्या हातात आहे. धागा कितीही साधा असला तरी आपले शिवसेना परिवाराचे नाते हे अतुट आहे. झाल्या असतील चुका कित्येक पटीने सर्व माफ करून एकत्र यावे हिच रक्षाबंधनानिमित्त मंगलमय शुभेच्छा’ असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.