Widgets Magazine

सर्वात मोठ्या कर्जमाफीची घोषणा, 34 हजार कोटीची कर्जमाफी

devendra fadnavis
यांनी शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्याचा 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्जमाफीमुळे 40 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे.
राज्यातील 90 लाख शेतक-यांना 34 हजार कोटींची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री बोलले आहेत.
ही सर्वात मोठी कर्जमाफी असून, आता यापेक्षा मोठा बोजा उचलण्याची राज्याची क्षमता नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतक-यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नियमित कर्ज भरणा-यांना 25 हजारांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान असं नाव देण्यात आलं आहे. या कर्जमाफीत घोटाळे होऊ नयेत यासाठी बँक आणि सोसायट्यांवर योग्य लक्ष ठेवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


यावर अधिक वाचा :