शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:32 IST)

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे येणार

AMRUTA FADNAVIS
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस आपल्या विविध वक्तव्याने तसेच गाण्यांमुळेही चर्चेत असतात. आता त्यांचे नवीन  गाणे  येणार असल्याची माहिती आता  मिळतेय. याचीच घोषणा अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्टवर केली आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला अमृता फडणवीस यांनी शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,”मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्यादिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय प्रार्थना अर्पण करते.”
अमृता फडणवीसांचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं भोलेनाथवर आधारित असू शकतं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.