शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:38 IST)

पिंगळे यांचा जामीन मंजूर

नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाई भत्याचे 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी नाशिकरोड कारागृहात असलेले मात्र सद्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे याना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या रकमेपैकी 57.73 लाख रुपयांच्या रकमेविषयी आज सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी केल्यावर अटक  केले होते. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑक्‍टोबरला जिल्हा बॅंकेतून रोख रक्कम नेणाऱ्या लीपीक दिगंबर चिखले, लेखापाल अरविंद जैन आणि सहाय्यक विजय निकम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 57 लाख 73 हजार रुपये मिळाले होते.