1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (15:43 IST)

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु ?

Dialogue between; Governor
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमान नाट्य रंगले होते.