रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (15:51 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी आंदोलन  करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या घेऊन संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  
 
यावेळी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकशाही मार्गाने आम्ही गडकरी यांच्या निवस्थानाकडे निघालो होतो. मात्र आम्हाला अमानवीय पद्धतीने आम्हाला पोलिसांनी अटक केली आहे. आमच्याशी झटापट केली. हे निंदनीय आहे. आमचं आंदोलन दडपण्याचे प्रयन्त करु आहे. याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना हा विषय सांगू, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.