गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2017 (22:54 IST)

मार्डकडून संप मागे

मार्डकडून संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आलं. तसंच उद्या सकाळी 8 वाजल्यापासून कामावर रुजू होणार असल्याचं मार्डने हायकोर्टात सांगितलं. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कामावर रुजू व्हा , नाहीतर कारवाई करू असा इशारा  दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय. मुंबईत डॉक्टरांच्या संपामुळे उपचाराअभावी सरकारी रुग्णालयातील 181 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात दिली. दरम्यान,संपामुळे बीएमसीच्या तीन रुग्णालयांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केईएममधील 53,नायर 34 आणि सायन रूग्णालय 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वकिलांनी दिली. इतकंच नाही तर राज्यभरातील रुग्णालयातील 380 जणही उपचाराअभावी दगावल्याचा दावा, वकिलांनी केला.