पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री

uddhav thackare
Last Modified सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (15:43 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्दयांना अनुसरुन जनतेला संबोधित केलं. मेट्रो कारशेड, सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा इथपासून ते राज्यातील शेतकरी आणि कोरोना परिस्थितीबाबतही त्यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.

कोरोनाशी दोन हात करत असताना सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 'कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही. जगात काही देशांत, तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळं आपल्याला सावधपणे पुढं जावं लागत आहे', असं म्हणत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शासनाची जनतेप्रती असणारी जबाबदारी अधोरेखित करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग असतानाही टप्प्याटप्प्यानं अनलॉक करत अनेक सुविधा आणि सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली. पण, अनेक ठिकाणी असं होत असतानाच कोरोनाचा मात्र विसर पडल्याचं भीषण चित्र पाहायला मिळालं. परिणामी काही अंशी नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली.
राज्यातील अशाच परिस्थितीवर भर देत आणि संकट टळलेलं नाही, हेच पुन्हा सांगत सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असं आवाहनही केलं.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

“सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले की ...

“सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले की नाही वाचा खुलासा
लशीच्या ट्रेडमार्कबाबत “सिरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया’ (सिरम) ने जून 2020 मध्येच अर्ज केला ...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोप भाषणात ...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोप भाषणात म्हटले आहे - ही माझ्या चळवळीची केवळ सुरुवात आहे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये ...

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही
बेळगावातील हुतात्मा दिनाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा भागासंदर्भात ...

धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता : ...

धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता : चित्रा वाघ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर ...

ऑफिसमधून तरुणीचे केले अपहरण, अवघ्या सहा तासात पोलिसांनी ...

ऑफिसमधून तरुणीचे केले अपहरण, अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपी प्रियकराला पकडले
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण ...