शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (10:55 IST)

संयुक्त महाराष्ट्रासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - डॉ. दीपक पवार

संयुक्त महाराष्ट्र चळवळ या विषयी महाराष्ट्राच्या जनतेत उदासीनता आहे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सुद्धा एकीकरण राहिलेले नाही. महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही, असे उद्गार डॉ. दीपक पवार यांनी विले पार्ले येथे झालेल्या व्याख्यानात काढले. ​
 
दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ रोजी दिनानाथ मंगेशकर बैठक सभागृह येथे मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त महाराष्ट्र चळवळ या विषयावर डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तसेच "मराठी शाळा" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
 
संयुक्त माहाराष्ट्राची चळवळ किती व्यापक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातले नेते कसे कमी पडतात या विषयी डॉ. दीपक पवार बोलत होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी सबंध महाराष्ट्राने विचार करायला हवा, असेही त्यांनी म्हटले. मराठी शाळा या विषयावरील चर्चासत्र रंगले. अनेकांनी आपले मत व्यक्त करत मराठी शाळेसाठी पालकांना जागृत केले पाहिजे असे सांगितले आणि मुंबई सकट महाराष्ट्रातील व्यवहार मराठीमध्येच झाले पाहिजे, असा निश्कर्ष काढण्यात आला. मराठी भाषेच्या पूर्व संध्येला मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि प्रबोधक युथ फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.