बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2016 (14:46 IST)

नाशिकमध्ये सुमारे ५०० कोटींचा ड्रायपोर्ट उभारणार

औद्योगिक आणि शेतीच्या दृष्टीने मह्त्वाचे शहर असणाऱ्या नाशिक येथे सुमारे ५०० कोटी रुपये खर्चून ड्रायपोर्ट उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते म्हणाले, की वाहतुकीचा खर्च अर्थातच लॉजिस्टिक कॉस्ट ही इतर देशात १२ टक्के आहे, तर भारतात ती १८ टक्के आहे. ती घटविण्यासाठी केंद्रातर्फे दळणवळणाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
देशात केवळ ५.८ टक्के जलवाहतुक चालते, हेच प्रमाण इतर देशांमध्ये ४७ टक्के इतके आहे. त्यामुळे देशातही यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विमानतळाच्या धर्तीवर जलतळ उभारणे आवश्यक आहे असे गडकरी यांनी सांगीतले.