testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

eaknath khadse
Last Modified शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:23 IST)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
खडसे यांनी जळगावमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना दमानिया यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती.
जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले होते की, माझ्या शेतातील उत्पन्नाबाबत काही वेळेस प्रश्न उपस्थित होतात. परंतु मला सांगायचे आहे की, माझ्या शेतातील आंबे आता मोठे झाले आहेत. कदाचित दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील.खडसेंच्या या वक्तव्यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप
घेतला होता.


यावर अधिक वाचा :