गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (14:54 IST)

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय चलनासंदर्भातल्या फेमा कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली. मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. 
 
अविनाश भोसले यांची मुंबईतील ईडी कार्यालयात पाच तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सकाळी १० वाजता भोसले ईडी कार्यालयात पोहोचले होते. चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  
 
ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते.दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.