शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (10:14 IST)

खडसे यांनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण

Eknath Khadese
भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी  दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही.  मात्र  खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. सुरुवातीला खडसे हे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती. पण त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.
 
याआधी मागच्या आठवड्यात खडसे यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीका केली होती. मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे