1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (16:29 IST)

एकनाथ खडसे यांचा अचानक यूटर्न, फडणवीसांवर केला कौतुकाचा वर्षाव

maharashtra news
विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  प्रवीण दरेकर हे विरोधकाची भूमिका चांगली पार पडत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खडसेंच्या या बदलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
 
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. गेले चार दिवस विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. तिथं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताहेत असे चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीने सरकारला जाब विचारायचो असे सांगत जुन्या गोष्टींना खडसेंनी उजाळा दिला. 
 
अधिवेशनात मी असो किंवा नसो आमचे नेते विरोधी पक्षाची भूमिका योग्य रितेने पार पाडत असल्याचेही खडसे यावेळी म्हणाले. त्यांच्या या बदलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.