राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी घेतले निर्णय  
					
										
                                       
                  
                  				  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकर्यांना 50 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.नियमित कृषी कर्ज फेडणार्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकर्यांना प्रति युनिट 1 रुपयांची  वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	अनुदान योजनेचा 50 हजार शेतकर्यांना फायदा होणार आहे. तसेच कर्जफेडीची मुदत तीन वर्षांची मुदत दोन वर्षांवर आणली आहे. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे, असे ही शिंदे म्हणाले. 
				  				  
	 
	याचबरोबर भातसा धरणासाठी 1550 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. लोणार सरोवर विकासाठी 370 कोटी देण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळाची बैठक होती.