Widgets Magazine
Widgets Magazine

महावितरण सुटीच्या दिवशीही बिले स्वीकारणार

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:46 IST)

electricity

केंद्र शासनाने जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे महावितरणच्या वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या ग्राहकांची वीज देयक भरण्याची तारीख 9 ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आहे अशा ग्राहकांना वीज देयक अथवा प्रॉॅम्ट पेमेंट भरण्यासाठी 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच बिले स्वीकारण्यासाठी सुटीच्या दिवशीही आवश्यकतेनुसार महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.
 
या संदर्भात महावितरणने परिपत्रक प्रसिद्ध केले असून त्यात ज्या वीजग्राहकांची वीज देयक अथवा प्रॉॅम्ट पेमेंटची तारीख 9 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आहे अशा ग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून महावितरणने त्यांची वीजबिल भरण्याची तारीख 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत वाढवली आहे.  याबाबत  नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती वीजग्राहकांना केली आहे. तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

यांनी डिझाइन केले आहे 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा

स्वच्छ भारत मिशनचा लोगो डिझाइन करणारे कोल्हापुराचे अनंत खसबरदार 500 आणि 2,000 रुपयांच्या ...

news

नव्या नोटांच्या बंडलने सोशल मीडियावर केला बोंब

अशात या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मुलीच्या हातात नव्या नोटांचा बंडल कसा

news

आठ बँक कर्मचार्‍यांचा सडक अपघातात मृत्यू

कानपूर- 500 आणि 1000 रुपय्यांच्या नोटा बदलण्यात आम जनतेला त्रास नको म्हणून रात्री उशिरा ...

news

जाणून घ्या 500 आणि 2000च्या नोटांची विशेषता

जाणून घ्या 500 आणि 2000च्या नोटांची विशेषता

Widgets Magazine