1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (08:30 IST)

शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात इन्फल्यूएंझासाठी विलगीकरण कक्षाची स्थापना

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृश्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
 
रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांचे क्लिनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आले आहे. राज्यात 2023 मध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत एकूण संशयीत रूग्ण 15 लाख 97 हजार 234 होते, तर बाधीत इन्फ्लुएंझा ए (एच 1 एन 1 + एच 3 एन 2) 3222 रूग्ण आहेत. सध्या रूग्णालयात 14 रूग्ण दाखल आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहसंचालक, आरोग्य सेवा डॉ. प्रतापसिंह सारणीकरण यांनी दिली आहे.