शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (14:48 IST)

खळबळजनक ! आईने अल्पवयीन मुलीचे वर्षभरात 3 वेळा लग्न लावून दिले,चौथ्या लग्नाची तयारी केली पण ..

Exciting! The mother married the minor girl 3 times in a year
महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातील भोकरदन मध्ये  एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यासाठी चौथ्यांदा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी आता या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने वर्षभरातच आपल्या 17वर्षीय अल्पवयीन मुलीचे चौथे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. प्रकरण जालना जिल्ह्याचे आहे. पोलिसांनी शुक्रवारी या अल्पवयीन मुलीची आईच्या तावडीतून सुटका केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीने आरोप केला आहे की तिची आई आणि तिच्या दोन भावाने तिचे चौथ्यांदा लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. 
याआधी तरुणीचे तीन वेळा वेगवेगळ्या तरुणांशी लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी मुलगी परत घरी आली. मुलीच्या भावाने मुलीचे चौथ्यांदा लग्न लावण्याचा प्रयत्न केला असता तिने पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी मुलीची आई आणि भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीला तिच्या आई-वडिलांविषयी माहिती नाही. ती म्हणाली माझे आई वडील कोण आहे हे मला माहित नाही. मी ज्यांच्या कडे राहते त्यांनीच माझे संगोपन केले आहे. तीच माझी आई आहे . भोकरदन शहरात म्हाडा परिसरात ही मुलगी आपल्या आई आणि दोन भावांसह राहते. तिच्या या आईने आणि भावांनी या अल्पवयीन मुलीचा बाल विवाह  पैसे घेऊन जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एका तरुणाशी लावून दिले.लग्नाच्या एका महिन्यानंतरच ही मुलगी आपल्या माहेरी परत आली. नंतर तिच्या आई आणि भावांनी तिचे दुसरे लग्न पाचोऱ्याच्या एका तरुणाशी लावून दिले. नंतर तिचे तिसरे लग्न देखील लावले. त्यानंतर देखील मुलगी घरी परत आली. या मुलीचे चौथ्यांदा लग्न लावण्याच्या तयारीत असता या मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.   
त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी मुलीची आई आणि भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.