मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (09:33 IST)

कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

Extension of deadline for submission of applications to candidates who have exceeded the maximum age Marathi Regional News In Webdunia Marathi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
अर्ज सादर करण्याचा कालावधी  दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये दिनांक ०१ मार्च, २०२० ते दिनांक १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडून प्रस्तुत दिनांक १७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधील कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे .अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३:५९ वाजेपर्यंत असणार आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी, २०२२ बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरावे.
 
विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येणार असल्याचेही श्री. भरणे यांनी सांगितले.