संबंधित माहिती
- Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरेंना भेटणार, ही ऑफर देऊ शकतात
- Tamasha Live- पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुलाला मंत्री करणार का? याचे उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले
- अश्विनी भिडेः 'मेट्र्रो वुमन' ओळख असलेल्या या IAS अधिकारी कोण आहेत?
- सौर कृषी वाहिनी योजना सुरू, फडणवीस यांची माहिती
फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुंबईत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.
एकनाथ शिंदेगट आणि भाजप या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या . राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे.
पुढील लेख
