Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिक जिल्हा बँकेचा अजब संतापजनक प्रकार गोठवली ६० हजार खाती

गुरूवार, 13 एप्रिल 2017 (22:18 IST)

नाशिक जिल्हा बँकेचा संतापजनक  कारभार समोर आला आहे. नाशिक जिल्हा बँकेने  ७ एप्रिल नंतर शेतकऱ्यांना कर्जवाटप करणे अपेक्षित आहे. मात्र  कर्ज वाटप झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज मिळण्याच्या अपेक्षेने ३१ मार्च २०१७ पूर्वी बँकेत पैसे भरले होते, तर  अशी सर्व  खाती गोठवण्यात आल्याने नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटना आणि बँकेचे संचालक मंडळ यांच्या  झालेल्या बैठकीत संघर्ष बघावयास मिळाला.त्यामुळे एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणत खाती गोठवण्याचा हा पहिलाच प्रकार असून शेतकरी वर्ग कमालीचा चिडला असून जर कर्ज वाटप केले नाही तर संचालक मंडळावर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असे शेतकरी वर्गाने इशारा दिला आहे.
 
यामागे जिल्हा बँका रिजर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या सीआरआर व्याजदर आणि कर्ज पुरवठा आणि वसुली यांच्यात ताळमेळ ठेवू न शकल्याने राज्यातील १२ जिल्हा बँका आर्थिक संकटात    सापडल्या आहेत. कर्जमाफी मिळण्याच्या आशेमुळे बऱ्याच अंशी कर्ज परतफेड न झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत या जिल्हा बँकांची लायसन्स रद्द ठरण्याची भीती असल्यामुळे जिल्हा बँका वाचवण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये भरावे लागण्याची चिन्हे आहेत.संघटनेने जिल्हा बँकेला २५ एप्रिल पर्यंत हा प्रश्न  सोडवून कर्ज वाटप न केल्यास प्रत्येक शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राष्ट्रवादीचे कोकणात आंदोलन

राज्यातील तमाम शेतकरी तसेच कोकणातील आंबा बागायतदार व मत्स्योत्पादकांना तात्काळ कर्जमाफी ...

news

राणे - अमित शहा भेट राजकीय हालचालींना वेग

सध्या कॉंग्रेस मध्ये नाराज असलेले कोकणाचे नेते माजी मंत्री नारायण राणे यांनी अहमदाबाद ...

news

श्रीनगर येथे मोठा तणाव पुन्हा मतदान सुरुवात

नेहमीच तणावात आणि आतंकवादी कृत्याने घूमसत असलेले काश्मीर पुन्हा मोठ्या तणावात आहे. तर ...

news

राणे - शहा भेट झालेली नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेसचे नेते अमाजी मंत्री असलेले नारायण राणे भाजप प्रवेशाच्या चर्चाला आता अहमदाबाद ...

Widgets Magazine