शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (16:04 IST)

थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! :दरेकर

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असताना त्यावर राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “भाजपाकडे बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले होते. त्यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी?” असा प्रश्न प्रविण दरेकरांनी केला आहे.
 
प्रविण दरेकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करून अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! महाविकासआघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.