1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:06 IST)

मुलाला पकडण्यासाठी पोलीस आले त्या भीतीने आईनेच जीव सोडला

Fearing that the police would come to arrest the child
श्रीरामपूर शहरात एक अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. एका चोरीच्या प्रकरणात आपल्या मुलाला पोलीस पकडायला आल्याच्या टेन्शनमध्ये आईचा जीव गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती परिसरात राहणाऱ्या एका मुलाचे नाव भंगार चोरी प्रकरणात काही आरोपींनी पोलिसांना सांगितले.त्यामुळे या चोरी प्रकरणात गायकवाड वस्ती परिसरात या मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक मुलाच्या घरी पोहोचले. परंतु आपल्या मुलाला पकडायला पोलीस आल्याचे समजताच या मुलाची आई विठाबाई काकडे (वय वर्ष -६०) यांना टेन्शन आल्यामुळे त्यांना छातीत दुखू लागले व हार्ट ॲटॅक आला .म्हणून त्यांना साखर कामगार रुग्णालय येथे नेले असता त्या मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.