मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यात हाणामारी

jail
Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये मंगळवारी तुंबळ हाणामारी झाली असून त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावरही हल्ला करण्यात आला. या घटनेने पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृह चर्चेत आले आहे. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान (४०) आणि मोहम्मद आजम असलम भट (४०) अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. नावेद हुसेन हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यापासून तो मध्यवर्ती कारागृहात आहे. मोहम्मद आजम याला खुनाच्या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मोहम्मद आजमची वर्तणूक योग्य नसल्याने त्यालाही फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास दोन्ही कैद्यांमध्ये वाद झाला व त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी सुरक्षारक्षक ईश्वरदास तुळशीराम बाहेकर (४४) रा. कारागृह वसाहत गेले. त्यांच्यावर दोघांनी हल्ला केला. या प्रकाराची कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की राज्यातील सर्व ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदनिमित्त ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा
ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी
कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी आणण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकाराने घेतला आहे. ...

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची ...

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची माहिती
देशातील काही स्तरांमधून लॉकडाउनवर कितीही टीका होत असली, तरीदेखील लॉकडाउनने 14 ते 19 लाख ...

महाराष्ट्रात विमानसेवेला स्थगिती

महाराष्ट्रात विमानसेवेला स्थगिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली उड्डाण सेवा लवकरच सुरू होणार ...