गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:33 IST)

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

File case against existing directors of Ahmednagar Urban Bank अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखलMarathi Regional News In Webdunia Marathi
कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एक महत्वाचे नाव समोर आले आहे.
यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक अनिल चंदूलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव (रा. उत्तरप्रदेश) आणि श्रीकांत दत्तात्रय खोरे (रा. मुळेवाडी ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार अनिल कोठारी याच्या डांबर मिक्सिंग प्लॉटच्या वाहनांमध्ये बायोडिझेल इंधन म्हणून वापरले जात होते. या टँकर सोबत असलेल्या पावतीवर सिल्वासा ते अहमदनगर असा पत्ता होता.
आरोपीच्या जबाबानुसार या बायोडिझेलचा वापर डंपर आणि इतर वाहनांना इंधन म्हणून वापरला जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, कर्जत पोलिसांनी ज्वलनशील पदार्थ पकडला आहे. याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे.
अहवाल आल्यानंतर ते बायोडिझेल आहे की, अन्य काही याची माहिती समोर येईल. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.