testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’

Last Modified मंगळवार, 10 जानेवारी 2017 (15:30 IST)
सांगलीत लवकरच जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’
साकारले जाणार आहे. २५ हजार चौरस फुटातील प्रस्तावित इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात आले असून, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध होणार आहे. १९४१ मध्ये बुद्धिबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर यांनी स्थापन केलेल्या येथील नूतन बुद्धिबळ मंडळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली असून या मंडळाने राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची पन्नास वर्षांची अखंड परंपराही जपल्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले गेले आहे. २८ डिसेंबर रोजी क्रीडा संचालकांकडे भवनासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत पाचमजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी हा आराखडा केला आहे. सहा कोटी ५८ लाखांचा हा प्रस्ताव आहे. कोणत्याही दिशेने या इमारतीकडे पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी ही रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही एक मोठा पट अंथरल्याचे चित्र दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आवश्यक असणारी काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षक गॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्था येथे प्रस्तावित आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंना खेळता येईल आणि राहता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...