testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

Last Modified शुक्रवार, 22 जून 2018 (16:06 IST)
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक महिने मत्स्यबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी दिसून येते आहे. मात्र बंदी नंतर ही जे मासे सहज मिळतात, त्याचाही जोरदार
तुटवडा आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत. पावसाळ्यात जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 महिन्यात बाजारात मासे फारच कमी प्रमाणात असतात. त्यात सर्वाधिक बोंबील, मांदेली असे मुंबई आणि आसपासच्या समुद्रात हमखास सापडले जातात. त्यामुळे आधी पकडलेले, बर्फात ठेवलेले मासेच सध्या विक्रीसाठी आहेत. परिणामी त्यांची किंमत प्रचंड वाढली आहे. 20 ते 30 रुपयांची मासळीदेखील शंभरच्याघरात विकली जात आहे.तर त्यातही चूक माणसांची आहे. खारफुटी नष्ट केल्याने यांत्रिक मासेमारी आणि समुद्रातील प्रदूषण याचा थेट परिणाम माशाच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे समुद्रात पावसाळ्यात मिळणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेदेखील कमी मिळत आहेत. ही धोक्याची घंटा आहे हे असेच सुरु राहिले तर येत्या काही वर्षात हे मासे मिळणे बंद होईल.
यामध्ये मांदेली वाटा प्रमाणे पूर्वी 20 रु. मिळत होती आता ती 90 ते 100 रुपये मिळते आहे. बोंबील एक वाटा 30-40 रु असे आता 100 ते 120 रुपये मिळत आहे. सूरमई (1 नग) 100-150 मिळत असे आता 250 ते 300 रुपये मिळते आहे. तर मोठी कोंळबी किलो 200 रु होती आटत 250 रु झाली आहे.

यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

इंडोनेशियाची 2032 ऑलिंपिकसाठी औपचारिक मागणी

national news
गेल्या वर्षी एशियन गेम्सच्या यशस्वी होस्टिंग नंतर इंडोनेशियाने 2032 ऑलिंपिक होस्ट ...