गणेश विसर्जानात राज्यात २२ जणांचा मृत्यू, पाच बेपत्ता

ganesh visarjan
मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक आणि नागपूर यांसह राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जनचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त
लाडक्या गणरायला निरोप देण्यासाठी भक्तांचा जनसागर समुद्रकिनाऱ्यांवर लोटला, गणेश विसर्जनादरम्यान काही ठिकाणी अघटित घटना घडल्याने विसर्जनाला गालबोट लागले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात २२ गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती – पूर्णा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू
अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं आहेत.

रत्नागिरी – राजापूरात तीन तरूण बुडाले
गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूरात दोन ठिकाणी घडली आहे. गुरूवारी सायंकाळी पावणे सात वाजता धोपेश्वर येथे सिध्देश प्रकाश तेरवणकर (वय २०) हा तरुण बुडाला. तर पडवे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरूण बुडाले. कुलदीप रमाकांत वारंग (वय २०) आणि ऋतिक दिलीप भोसले (वय २६) असे बुडालेल्यांची नावे आहेत.
तारकर्ली – आचरा समुद्रात दोन तरूण बुडाले
येथील आचरा समुद्रामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.

नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू
नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात दोघांचा मृत्यू
गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.

वाशिम – घरगुती गणेश विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू
घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्येही एकाचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील तामसा गावातलील एका तरूणाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार (वय २१) असं त्या युवकाचं नाव आहे.

ठाणे – शहापूरात मुलाचा बुडून मृत्यू
कुंडनच्या नदी तोल जावून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्पेश प्रकाश जाधव ( वय १२ ) असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे.
कराडमध्ये एकाचा मृत्यू
आगाशिव नगर येथील चेतन शिंदे हा गणेश भक्त कोयना नदीमध्ये वाहून गेला आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहामुळे मुलगा सापडला नाही.

भंडाऱ्यात एकाचा मृत्यू
लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेले आहेत. त्यांचे वय ४० वर्षे आहे. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही.
वर्धा – विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू
गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू झालाय. जुनापाणी येथे शेतातील विहिरीत विसर्जन करीत असताना तरुण बुडाला. गुणवंत गाखरे असं मृतकाचं नाव.

नाशिक : शहर व परिसरात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नाशिकमधील गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा येथे तिघेजण बुडाले. 5 गणेशभक्तांना सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांना यश आले तर एक महाविद्यालयीन तरुण युवक बेपत्ता झाला आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र
राज्यात अत्त्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याचे ...

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा
राज्यात सध्या १ हजार २५० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० ...

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर
राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ जणांच्या मृत्यू नोंद ...

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या ...

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू
राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना १५ ...