शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (15:00 IST)

धक्कादायक! पिंपरीत भोंदूबाबाचा पाच बहिणींवर अत्याचार

पुत्र प्राप्तीसाठी तसेच घरात दडलेलं गुप्त धन मिळवून देतो, असी आश्वासनं देत एका भोंदूबाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर दुष्कर्म केल्याची बातमी आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
 
सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२) असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. या प्रकरणी 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. माहितीनुसार, भोंदूबाबाने घरात पुत्रप्राप्तीसाठी आणि घराच्या एका खोलीत गुप्त धन असल्याची लालूस देत तीन उतारे आणि नग्न पूजा करण्याचा सल्ला दिला. त्याने सांगितले की घरात सात पेटया धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. 
 
त्याने घरातील एका मुलीचा जीव धोक्यात असल्याचे देखील म्हटले होते आणि हे सर्व संकट उतरण्यासाठी पूजा करण्याचा सल्ला देत यासाठी 3 रुपये खर्च येईल असे म्हटले. घराच्यांना घापल्यात घेऊन भोंदूबाबाने पैसे उकळले आणि बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने मुलींसोबत दुष्कर्म केले. या घटनेबाबद वाच्यात केल्यास देव शक्ती आणि काळ्या जादूने मारुन टाकेन अशी धमकी दिली. फिर्यादीप्रमाणे त्याने सर्व बहिणींवर अत्याचार केले. 
 
तक्रार दाखल केल्यावर भोंदूबाबाला अटक केली गेली असून त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.