मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (07:42 IST)

वर्ध्यात शेतातून तीन टन संत्र्याची जबरी चोरी

forced-theft-of-three-tonnes-of-oranges-from-a-field-in-wardha
वर्ध्यातील कारंजा तालुक्यामधील खरसखांडा येथील माजी सरपंच विकास नासरे यांच्या शेतात एक हजार सहाशे संत्रा झाड आहे. त्यातून संत्रा 56 हजार रुपये टनाने विक्री केला. संत्राची शेतात तोड सुरू असताना दोन ट्रक नेण्यात आला आहे. 5 टन संत्रा शेतात शिल्लक राहिला. शिल्लक असलेल्या संत्रा ढिगाऱ्यातून पहाटे 3 वाजताच्या सुमारास टेम्पो वाहनात भरून संत्रा चोरी करण्यात आला. 
 
पहाटे 3 वाजताच्या सुमारास शेतात अज्ञात 5 जण आले, त्यांनी संत्राच्या ढिगाऱ्याजवळ शेतमजूर झोपलेला असताना पाच जणांना येऊन त्याला डांबून ठेवले, त्याच्या खिश्याची पाहणी केली त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर चादर टाकून डांबून ठेवले याबाबत तू मालकाला सांगू नको तुला आम्ही काहीही करणार नाही असे सांगून काही अंतरावर असलेलं वाहन भ्रमणध्वनी करून बोलावण्यात आले. यात हिंदी व मराठी भाषिक असलेले चोरटे असल्याचे सांगण्यात आले. टेम्पो शेतात संत्रा ढिगाऱ्याजवळ आणून कॅरेट ने संत्रा भरण्यात आला जवळपास त्यांना दीड तास संत्रा भरायला लागला.चोरी करताना शेतमजुराला डांबून जबरी चोरी करण्यात आली.
 
शेतात संत्रा तोड सुरू आहे. त्यातील काही संत्रा नेण्यात आला होता तर जवळपास 5 टन संत्रा शेतात ढिगारा लावण्यात आला होता त्याठिकाणी शेतमजूर रखवालदार ठेवण्यात आला होता.त्याला डांबून त्याच्या डोळ्यादेखत टेम्पो मध्ये कॅरेट भरुन संत्रा चोरून नेला.पहाटे शेतमजूर संत्रा मालकाच्या घरी येऊन याबाबत माहिती दिली असता त्यांनी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल केली असून 3 टन संत्रा जवळपास 1 लाख 65 हजाराचा चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल माहूर करीत आहे.
 
महागड्या संत्राची चोरी
सध्या संत्राचे दर चांगले असल्याने संत्रा शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यामुळे अनेकांनी संत्रा यापूर्वी विक्री केला आहे तर काही शेतकऱ्यांनी भाववाढी मिळेल या आशेने शेवटी तोडण्यात येत आहे तीन दिवसांपासून शेतात तोड सुरू आहे. यातील काही संत्रा नेण्यात आले तर काही संत्रा वाहनात भरला नसल्याने शेतात ठेवण्यात आला त्याठिकाणी शेतमजूर रखवाली करण्यासाठी ठेवण्यात आला होता तरी शेतातून संत्रा चोरून नेल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.संत्राला चांगला दर मिळत असल्याने संत्र्याची चोरी केली जात असल्याचे बोलले जात आहे.