माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात देशमुख यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात छातीत दुखण्याची अनिल देशमुखांची ही दुसरी वेळ आहे. याआधीही छातीत दुखत असल्याने त्यांना परळच्या केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख हे सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांती तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे दोन ते तीन दिवस त्यांना अजून जेजे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.