सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 जुलै 2023 (10:48 IST)

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या बचावकार्याचा चौथा दिवस, मृतांची संख्या 27 वर

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना बुधवारी (19 जुलै) रात्री उशीरा घडली होती. यानंतर सुरू करण्यात आलेल्या बचावकार्याचा आज चौथा दिवस आहे.दुर्घटनेनंतर येथील दुर्गम भौगोलिक स्थिती अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे आले. पण तरीही बचावकार्य वेगाने सुरू आहे.
 
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून शनिवार (22 जुलै) सायंकाळी 7 वाजता एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
 
यानुसार, इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अंदाजे 78 जण अजूनही बेपत्ता असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. या घटनेत एकूण 22 जण जखमी झाले असून ते जवळच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

इर्शाळवाडीमध्ये एकूण 43 कुटुंबं राहत होती. त्यांची एकूण लोकसंख्या ही 229 इतकी होती. त्यापैकी 27 जण मृत्यूमुखी पडले असून 124 जण सुखरूप आहेत. तर 78 जण अद्याप बेपत्ता असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधित व्यक्तींची संख्या अंतिम करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर एकूण लोकसंख्या, कुटुंबसंख्या, घरे, जनावरे, मयत आणि बेपत्ता व्यक्ती यांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
दुर्घटनेतून वाचलेल्या दरडग्रस्तांना सध्या पंचायतन मंदिर नढाळ येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय वाडीतील 31 विद्यार्थी विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. तसंच नातेवाईकांकडे काही कारणानिमित्त गेलेल्या 16 जणांचेही या दुर्घटनेतून प्राण वाचले आहेत.
 
येथील नागरिकांसोबतच इर्शाळवाडीत काही प्रमाणात पाळीव जनावरांनाही आपले प्राण गमावावे लागले. त्यामध्ये 4 बैल, 3 शेळ्या यांचा समावेश आहे.
 
सध्या दरडग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवासासाठी सूर्या हॉटेलसमोर चौक येथे 34 पोर्टेबल कंटेनर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
 
सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन, NDRF, SDRF, TDRF यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचं अग्निशमन दल आणि इतर खासगी मदतकर्तेही तैनात आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असलं तरी पावसामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत.
 
Published By- Priya Dixit