शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:44 IST)

Gadchiroli: काय म्हणता, शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवले

school reopen
Gadchiroli: शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली येथे घडला आहे. शिक्षक या विद्यार्थीनीला महिन्याला 1500 रुपये देत होता. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
गडचिरोली  जिल्ह्यातील कोरची  मुख्यालयापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे हा प्रकार घडला आहे.  शिक्षक सुशील आडीकने या शिक्षकाने चक्क रोजंदारी विद्यार्थीनीला आपल्या जागी शिकविण्यासाठी ठेवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे वर्ग 1 ते 5 पर्यंत वर्ग असून यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षक हे शाळेत येतच नाही. तर, मग येथे विद्यार्थी शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
आदिवासी बहुल असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुशील आडिकणे यांनी चरवीदंड येथील एका बारावीचे शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना 1500 रुपये महिन्याप्रमाणे शिकवायला ठेवले होते. शिक्षकांनी एका बोगस शिक्षकाची नियुक्ती या शाळेत केली असल्याचे दिसून आले यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 



Edited By - Ratnadeep Ranshoor