सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जुलै 2018 (08:50 IST)

नाशिकचे गंगापूर धरण बॉम्बने उडवून देऊ, मिळाली धमकी

नाशिक तालुका पोलिस ठाण्यास गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने फोन करून गंगापूर धरण बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा गंगापूर धरण परिसरामध्ये सायंकाळपासून बॉम्बची शोधाशोध करीत आहे. सुमारे चार तास परिसर पिंजून काढला असता कुठल्याहीप्रकारची धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी दिली.
 
कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. कोणी अशी अफवा पसरवत असेल तर त्याची त्वरित माहिती पोलिसांना द्या. किंवा कोणी अश्या प्रकारे फोन करून यंत्रणेला त्रास देत असेल तर पोलिसां लगेच कळवा असे आवाहन केले.
 
गंगापूर धरण सुमारे ७८ टक्के भरले असून या धरणातून संपुर्ण नाशिकला पाणीपुरवठा केला जातो.