1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (21:38 IST)

सरकारने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ मदत करावी : दरेकर

राज्य सरकारने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ मदत करण्याची विनंती केली आहे.
 
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, सद्यस्थितीत राज्यांमध्ये ५०००० पेक्षा जास्त शिक्षक विनाअनुदानित शाळेत आहेत. निवडणुकीपूर्वी आघाडीतील घटक पक्षांनी सत्तेवर आल्यास अनुदान देऊ असे आश्‍वासन दिल्याने, अनुदान मिळेल या आशेवर शिक्षक होते. मागील १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत, त्यामुळे शिक्षकांना जे तुटपुंजे वेतन मिळायचे ते देखील बंद झाले आहे. शिक्षणासारखे पवित्र ज्ञानदानाचे काम करूनही, ५०००० कुटुंबांवर उपाशी राहण्याचो वेळ आली आहे. काल काही माध्यमांनी याची दखल घेत बातमी केली, त्यावेळी असे लक्षात आले की तब्बल ५०,००० कुटुंब  उघड्यावर आली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.